मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेनेचा डंका; अ‍ॅड. अनिल परब विजयी

मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेनेचा डंका; अ‍ॅड. अनिल परब विजयी

मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अ‍ॅड. अनिल परब यांचा 26 हजार 26 मतांनी विजय झाला आहे. अनिल परब यांनी भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव केला आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठीही मतदारांनी भाजपला नाकारले असून मुंबईपदवीधर मतदारसंघातही शिवसेनेचाच डंका आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान झाले होते.

विजयानंतर अनिल परब म्हणाले की, हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करतो. बाळासाहेबांचा आशीर्वाद असाच कायम राहू दे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी आभारी आहे. माझ्या विजयासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीचे घटकपक्ष लढले त्यांचा आभारी आहे. मुंबई फक्त शिवसेनेचीच आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ‘शिवसेना आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची’ हे सिद्ध झाले आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच असणार, तीही उद्धव ठाकरेंची शिवसेना असणार. मुंबईचा मतदार हा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मागे उभा आहे, असेही परब म्हणाले.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ॲड. अनिल दत्तात्रय परब यांच्या दणदणीत विजयाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;