आयुष शर्माने केला सलमान खान याच्या बहिणीसोबतच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा, म्हणाला, माझे आई वडील हैराण आणि…

आयुष शर्माने केला सलमान खान याच्या बहिणीसोबतच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा, म्हणाला, माझे आई वडील हैराण आणि…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा हा नेहमीच चर्चेत असतो. विशेष म्हणजे आयुष शर्मा हा बॉलिवूडच्या चित्रपटांमध्येही धमाल करताना दिसतो. आयुष शर्माची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंगही बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, आयुष शर्मा आणि अर्पिता यांचा घटस्फोट होणार आहे. मात्र, आयुष शर्मा याच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले की, या फक्त आणि फक्त अफवा आहेत. आयुष शर्मा आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो.

नुकताच आयुष शर्मा याने मोठा खुलासा केलाय. पहिल्यांदाच आयुष शर्मा हा अर्पिता खान हिच्यासोबतच्या लग्नाबद्दल बोलताना दिसला आहे. आयुष शर्मा म्हणाला की, मी ज्यावेळी माझ्या आई वडिलांना अर्पिताबद्दल सांगितले, त्यावेळी ते टेन्शनमध्ये आले. माझे पालक म्हणाले, तू काहीच काम करत नाही, काही पैसेही कमावत नाही आणि तुला इतक्या श्रीमंत घरातील मुलगीसोबत लग्न करायचे आहे.

तू सर्व खर्च कसा उचलणार? आयुष पुढे म्हणाला की, माझ्या निर्णयामुळे माझे पालक खूप चिंताग्रस्त झाले होते. कारण त्यावेळी मी काहीच काम करत नव्हतो. त्यानंतर घरी पैशांची मदत मागितल्याचे देखील आयुष शर्मा याने म्हटले. मात्र, त्यांनी भितीमुळे थेट मला त्यासाठी नकार दिला. म्हणजे त्यावेळी अनेक गोष्टींची चिंता होती.

माझ्या आईला वाटत होते की, दोन्ही परिवार एकत्र कसे येतील. पुढे आयुष म्हणाला की, माझ्या कुटुंबियांनी त्यानंतर अर्पिताला एकदम आनंदात सून म्हणून स्वीकारले. ज्यावेळी माझे पालक खान कुटुंबियांना भेटले तर ते त्यांचे मोठे चाहते झाले. आता दोन्ही कुटुंबामध्ये खूप जास्त चांगले रिलेशन आहे. आता आयुष शर्माच्या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

आयुष शर्मा हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. विशेष म्हणजे आलिशान असे घर देखील त्याच्याकडे आहे. 2018 मध्ये लवयात्री चित्रपटातून त्याने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. रिपोर्टनुसार आयुषचे नेटवर्थ 67 कोटी आहे. 2022 मध्ये अर्पिता आणि आयुषने एक आलिशान बंगला खरेदी केला. या बंगल्याची किंमत 10 कोटी आहे. हेच नाही तर आलिशान गाड्यांचेही त्याच्याकडे कलेक्शन आहे त्यांच्याकडे आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;