सुपरस्टारचा भर कार्यक्रमात कचरा, तरुणीच्या खांद्यावर हात ठेवला; पुढे जे झालं त्याने…

सुपरस्टारचा भर कार्यक्रमात कचरा, तरुणीच्या खांद्यावर हात ठेवला; पुढे जे झालं त्याने…

Thalapathy Vijay Female Student Video : तामिळ चित्रपटांचा सुपरस्टार म्हणून थलपती विजयला ओळखला जाते. थलपती विजय हा सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. त्याने काही दिवसांपूर्वीच त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्याने घराबाहेर आलेल्या अनेक चाहत्यांची भेट घेतली. याचे अनेक व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता थलपती विजय हा एका नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.

थलापती विजयचा व्हायरल होणारा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर थलपती विजयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो एका शाळकरी मुलीचा शाल परिधान करत सत्कार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर तो त्या विद्यार्थिनीसोबत फोटो काढण्यासाठी तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा राहतो. त्यानंतर ती विद्यार्थिनी थलपती विजयचा हात खांद्यावरुन काढून टाकते, असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता.

व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय?

यावरुन अनेकांनी थलपती विजयला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अखेर या घटनेचे संपूर्ण सत्य समोर आले आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत थलपती विजय हा त्या विद्यार्थिनीचा सत्कार केल्यानंतर तिला शाल परिधान करतो. त्यानंतर तो तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा ती विद्यार्थिनी थलपती विजयचा हात खांद्यावरुन काढते आणि ती थलपती विजयच्या हातात हात घालून फोटो काढते, असे पाहायला मिळत आहे.

या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर काहींनी तो व्हिडीओ अर्धवट किंवा मोडतोड करुन दाखवल्याचे बोललं जात आहे. तर काहींनी जाणूनबुजून वाद निर्माण व्हावा, या दृष्टीने या व्हिडीओची तोडमोड करण्यात आली आहे, अशीही प्रतिक्रिया समोर येत आहे.

दरम्यान अभिनेता थलपती विजय हा सध्या ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास 300 कोटी रुपये आहे. हा चित्रपट येत्या 5 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;