चिपळूण शहरात मगरीचा मुक्त संचार; नागरिकांमध्ये दहशत

चिपळूण शहरात मगरीचा मुक्त संचार; नागरिकांमध्ये दहशत

चिपळूण शहरातील चिंचनाका भागातील भर रस्त्यावर रविवारी मध्यरात्रीनंतर एक मोठी मगर मुक्तपणे फिरताना आढळली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

चिपळूण आणि चिपळूणवासियांना मगरीचे दर्शन नवे नाही. मात्र, अजून जोरदार पावसाची सुरुवातही नाही, तसेच शहरात सध्या पुरासारखी स्थिती नाही. तरीही भर रस्त्यात एक मोठी मगर मनसोक्तपणे फिरताना दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही वाहनचालकांनी रस्त्यावर वावरणाऱ्या मगरीचे मोबाईल कॅमेऱ्यात चित्राकरण केले. त्यानंतर सोशल मीडियावर याचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत.

पावसाळा सुरू झाला असला तरी चिपळूण शहरात सध्या पुरासारखी परिस्थिती नसतानाही अचानक भर रस्त्यात मगरीचे दर्शन घडले. रस्त्यावर मगर दिसताच याची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;