झोपेत चालण्याचा आजार बेतला जिवावर, 19 वर्षीय मुलाचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू

झोपेत चालण्याचा आजार बेतला जिवावर, 19 वर्षीय मुलाचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू

अनेकांना झोपेत चालायचा सवय असतो. मात्र हीच सवय एकाच्या जीवावर बेतली आहे. मुंबईतील भायखळा येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय मुलाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याला सेफी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

मुस्तफा इब्राहिम चुनावाला (19) असे त्या मृत मुलाचे नाव आहे. भायखळा पोलीस स्थानकाच्या हद्दीत माझगाव येथे टॉवर नंबर 1, नेसबीट रोड येथे मुस्तफा राहत होता. त्याला झोपेत चालायची सवय होती. 30 जूनच्या मध्यरात्री तो झोपेतच सहाव्या मजल्यावर चालत गेला आणि खाली पडला. यात तो गंबीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी तिथल्या सेफी रुग्णालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याच्या मृत्यूने चुनावाला कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;