अमिताभ बच्चन यांच्या नातवाची गर्लफ्रेंड बनणे नाही सोपे, जया बच्चन आणि श्वेता…

अमिताभ बच्चन यांच्या नातवाची गर्लफ्रेंड बनणे नाही सोपे, जया बच्चन आणि श्वेता…

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अगस्त्य नंदा याने नुकताच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. अगस्त्य नंदा याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंगही बघायला मिळते. विशेष म्हणजे अगस्त्य नंदा सोशल मीडियावर सक्रिय देखील दिसतो. अगस्त्य नंदाच्या अभिनयाचे काैतुक देखील करण्यात आले. अगस्त्य नंदा याचे नाव सुहाना खान हिच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून जोडले जातंय. मात्र, दोघांनीही कधीच त्यांच्या नात्यावर भाष्य केले नाहीये.

अगस्त्य नंदा हा बहीण नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच पोहोचला होता. विशेष म्हणजे यावेळी आजी जया बच्चन, आई श्वेता बच्चन यांच्यासोबत अगस्त्य नंदा दिसला. यावेळी काही मोठे खुलासे करतानाही अगस्त्य नंदा दिसला. पहिल्यांदाच आपल्या डेटिंगबद्दल बोलताना अगस्त्य नंदा हा दिसलाय. अगस्त्य नंदाच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.

नव्या नवेली नंदा म्हणाली की, अगस्त्यच्या आयुष्यामध्ये कोणीही मुलगी आली तरीही तिला आमच्या तिघींचा सामना करावा लागेल. त्यावर अगस्त्य नंदा याने आजी जया बच्चन यांच्याकडे इशारा करत म्हटले की, सर्वात जास्त अवघड आहे. त्याच्यानंतर त्याने आई श्वेता बच्चनचे नाव घेतले आणि त्यानंतर नव्या नवेली नंदा हिचे नाव घेतले.हे एकून जया बच्चन आणि श्वेता बच्चन हसतात.

यावर अगस्त्य नंदा म्हणाला की, मी सर्वात जास्त वेळ तुमच्या तिघींसोबतच घालवतो. मला माहिती आहे की, तुम्ही तिघी एकसारख्याच आहेत. म्हणजेच काय तर अगस्त्य नंदा याच्या आयुष्यात येणाऱ्या मुलीला या तिघींचा सामना करावा लागणार आहे. अगस्त्य नंदा नेमका कोणाला डेट करत आहे हे सातत्याने चाहत्यांकडून विचारले जाते.

आता अगस्त्य नंदा हा लवकरच ‘इक्कीस’मध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात धर्मेंद्र हे देखील महत्वाच्या भूमिकेत धमाका करताना दिसणार आहेत. अगस्त्य नंदा याच्याकडे अजून काही चित्रपटांच्या ऑफर असल्याचे देखील सांगितले जातंय. नव्या नवेदी नंदा ही बॉलिवूडमध्ये काम करणार नसल्याचे बच्चन कुटुंबाकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;