ज्या इमारतीत आधीच 9 फ्लॅट्स, तिथेच आमिर खानने विकत घेतला कोट्यवधींचा अपार्टमेंट
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अर्थात अभिनेता आमिर खानने नुकतंच मुंबईतील वांद्रे इथल्या पाली हिल परिसरात बेला विस्ता अपार्टमेंट्समध्ये एक नवीन आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. आमिरचा हा नवीन फ्लॅट रेडी-टू-मूव्ह-इन असून तो जवळपास 1027 चौरस फुटांवर पसरलेला आहे. याच इमारतीत आमिरचे इतर नऊ फ्लॅट्स आहेत.
आमिरने 9.75 कोटी रुपयांना हे नवीन अपार्टमेंट विकत घेतलं आहे. रिपोर्ट्सनुसार, आमिरची एकूण संपत्ती जवळपास 1862 कोटींच्या घरात आहे. आमिरने 25 जून रोजी नवीन अपार्टमेंट विकत घेतलं असून त्यासाठी 58.5 लाख रुपये स्टँप ड्युटी भरली होती.
'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'बेला विस्ता अपार्टमेंट्स'मध्ये 24 पैकी 9 युनिट्सचा मालक आमिर खानच आहे. याशिवाय मरिना अपार्टमेंट्समध्येही त्याचे फ्लॅट्स आहेत. आमिरचा रिअल इस्टेट पोर्टफोलिओ बराच मोठा आहे. बेला विस्ता आणि मरिना अपार्टमेंट्सशिवाय मुंबईतील कार्टर रोडजवळही त्याचं एक अपार्टमेंट आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List