दीपिकाचा बेबी बंप, वर्ल्ड कप हे सर्व झालं असेल तर..; अभिनेत्याकडून कामाची मागणी

दीपिकाचा बेबी बंप, वर्ल्ड कप हे सर्व झालं असेल तर..; अभिनेत्याकडून कामाची मागणी

‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता करण पटेल सध्या कामाच्या शोधात आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक उपरोधिक पोस्ट लिहित त्याने कामाची मागणी केली आहे. या पोस्टमध्ये त्याने वर्ल्ड कप आणि दीपिका पादुकोणच्या प्रेग्नंसीचाही उल्लेख केला आहे. त्याने लिहिलं, ‘ओके, आता सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत, भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे, दीपिका पादुकोणचा क्युट बेबी बंप पहायला मिळाला, लवकर आई-बाबा होणाऱ्या त्या दोघांना शुभेच्छा. आता, आपण कामाकडे परतुयात का? आणि माझ्यासाठी एखादी भूमिका असेल तर कळवा.’ गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये दिसणाऱ्या बातम्यांचा उल्लेख करत त्याने ही पोस्ट लिहिली आहे.

काही आठवड्यांपूर्वी जेव्हा अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या प्रमोशनला पोहोचली, तेव्हा तिच्या बेबी बंपची जोरदार चर्चा झाली होती. दीपिकाने 29 फेब्रुवारी रोजी तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली. सप्टेंबर महिन्यात ती आणि रणवीर आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियावर दीपिकाच्या प्रेग्नंसीची सतत चर्चा होत आहे. त्याचप्रमाणे टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजय पटकावल्यानंतर संपूर्ण देशभरात त्याची चर्चा झाली. या घटनांचा उल्लेख करत करणने त्याच्यासाठी कामाची मागणी केली आहे.

करण पटेलची पोस्ट-

करण पटेलने अनेक मालिका आणि रिॲलिटी शोजमध्ये काम केलंय. ‘झलक दिखला जा 6’ आणि ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 10’मध्ये त्याने भाग घेतला होता. ऑक्टोबर 2020 मध्ये तो ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये झळकला होता. त्यानंतर त्याला फारसं काम मिळालं नाही. करणला अनेकदा ‘बिग बॉस’ या शोची ऑफर देण्यात आली होती. मात्र प्रत्येक वेळी त्याने ती नाकारली. ‘बिग बॉस हा शो अत्यंत घाणेरडा आणि अपमानास्पद आहे’, असं तो म्हणाला होता.

बिग बॉस या शोवरील कमेंटनंतर करणला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगनंतर त्याने स्पष्टीकरणसुद्धा दिलं होतं. “माझ्या वक्तव्याचा अर्थ चुकीचा घेतला गेला. संवेदनाहीन डोक्यामध्ये विचार करण्याची क्षमताच नसते. मला जे म्हणायचं होतं तेच सलमान भाईसुद्धा सतत सांगतात की हा शो इतका घाणेरडा झाला आहे की तोसुद्धा त्याच्या आईसोबत बसून बिग बॉस बघू शकत नाही. मीसुद्धा तेच म्हटलंय. म्हणूनच मी त्या शोमध्ये सहभागी होत नाही”, अस त्याने स्पष्ट केलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;