पश्चात्तापाच्या वेदनेपेक्षा..; मलायकासोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुनच्या पोस्टने वेधलं लक्ष

पश्चात्तापाच्या वेदनेपेक्षा..; मलायकासोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुनच्या पोस्टने वेधलं लक्ष

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या दोघांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा आहेत. 2018 पासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा त्यांनी मोकळेपणे एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त केलं. मात्र आता ब्रेकअपनंतर दोघंही त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सतत काही ना काही पोस्ट शेअर करत आहेत. मलायकासोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुनने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. वेदना आणि पश्चात्ताप यांच्याविषयीची ही पोस्ट आहे. त्यावरून पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायकाचं नाव अर्जुनशी जोडलं गेलं होतं. अखेर मलायकाच्या वाढदिवशी सोशल मीडियावर पोस्ट लिहित अरबाजने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. आता मात्र या दोघांमध्ये काहीच आलबेल नसल्याचं समजतंय.

अर्जुन कपूरची पोस्ट-

पश्चातापाच्या वेदनापेक्षा शिस्तीमुळे होणारी वेदना चांगली, अशा आशयाची पोस्ट अर्जुन कपूरने लिहिली आहे. काही दिवसांपूर्वीच मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये विश्वासाबद्दलची एक पोस्ट शेअर केली होती. ‘मला अशी लोकं आवडतात ज्यांच्यावर मी डोळे बंद करून आणि त्यांच्याकडे पाठ करून विश्वास करू शकते’, अशी ही पोस्ट होती.

अर्जुनने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. दरवर्षी वाढदिवसानिमित्त मलायका त्याच्यासाठी आवर्जून पोस्ट लिहिते. मात्र यावेळी तिने सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट लिहिली नव्हती. इतकंच नव्हे तर अर्जुनच्या बर्थ-डे सेलिब्रेशनमध्येही ती दिसली नाही. एरव्ही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करणारे हे दोघं अचानकच नात्याविषयी मौन बाळगू लागल्याने, चाहत्यांच्याही मनात प्रश्न उपस्थित झाला आहे. 19 वर्षांच्या संसारानंतर मलायका आणि अरबाज यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. अर्जुनसोबतच्या नात्यामुळे मलायका अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता दोघं एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायका प्रेमाविषयी म्हणाली, “काहीही झालं तरी खऱ्या प्रेमाच्या संकल्पनेवरील माझा विश्वास कधीच उडणार नाही. वृश्चिक रास असणारे असेच असतात. मीसुद्धा अगदी तशीच आहे, त्यामुळे शेवटपर्यंत मी प्रेमासाठी लढेन. पण त्याचसोबत मी वास्तवाशी जोडून असते. मर्यादेची रेष कुठे ओढायची हे मला नीट ठाऊक आहे.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;