पंजाबवरून नांदेडला जात असताना इनोव्हा कारची ट्रकला जोरदार धडक, चौघांचा जागीच मृत्यू

पंजाबवरून नांदेडला जात असताना इनोव्हा कारची ट्रकला जोरदार धडक, चौघांचा जागीच मृत्यू

पंजाबवरून नांदेडला जात असताना एका इनोव्हा कारची ट्रकला धडक झाली. या अपघातात 4 भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे घडली आहे .यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते .

पंजाबमधून नांदेड येथे काही भाविक गुरुद्वारा दर्शनाकरिता इनोव्हा कारने निघाले होते. नागपूर- तुळजापूर या महामार्गावर कळंब जवळ या इनोव्हा कारने ट्रकला धडक दिली. सोमवारी सकाळची पावणेसहाची घटना असल्याचे सांगितले जाते. अपघात इतका भीषण होता की इनोव्हा गाडी ही अक्षरश: ट्रकच्या मागच्या भागात जाऊन अडकून पडली आणि सुरक्षेच्या दृष्टीने लावलेल्या एअर बॅग्स च्या सुद्धा चिंधड्या झाल्या. कळंबच्या पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत 2 पुरुष आणि 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला. मदतीसाठी गावकरी पुढे सरसावले . इनोव्हा कार मधील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती केले आहे .

घटनेची माहिती मिळताच आमचे सहकारी घटनास्थळी पोहचले आणि तत्काळ मदतकार्य सुरु केले . हे भाविक पंजाबमधून आले आहेत . ट्रक आणि इनोव्हा कार या एकाच दिशेने यवतमाळकडे चालल्या होत्या . इनोव्हा कारने ट्रकला मागून धडक दिली. रात्रभर प्रवास केल्याने ड्रायव्हरला झोप लागली असून त्यातून हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आम्ही पुढील तपास करीत आहोत . मी स्वतः घटनास्थळी भेट द्यायला निघालो आहे

– डॉक्टर पवन बनसोड ( पोलीस अधीक्षक , यवतमाळ )

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;