Bigg Boss OTT 3: वोटिंगचा ड्रामा कशाला? पायल मलिक एलिमिनेट होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

Bigg Boss OTT 3: वोटिंगचा ड्रामा कशाला? पायल मलिक एलिमिनेट होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. रविवारी या सिझनमधून पायल मलिक बाद झाली. प्रेक्षकांकडून सर्वात कमी मतं मिळाल्याने पायलला बिग बॉसचं घर सोडून जावं लागलं. पायल तिचा पती अरमान मलिक आणि सवत कृतिका मलिक यांच्यासोबत बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. ‘जनतेनं आपला निर्णय जाहीर केला आहे. पायल मलिकला घराबाहेर जावं लागेल’, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. हा निर्णय चुकीचा असल्याचं अनेकांनी म्हटलंय. ‘हे योग्य नाही. दीपक, नेझी, मुनिषा आणि सना सुलतान बिग बॉसच्या घरात काय करत आहेत? हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे’, असं नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

‘पायलचं घराबाहेर जाणं चुकीचं आहे. हा पक्षपात आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे जग चांगल्या लोकांसाठी नाहीच आहे वाटतं. हे पुन्हा एकदा बिग बॉसच्या शोमधून सिद्ध झालंय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. काहींनी पायलला बिग बॉसची विजेती असल्याचं म्हटलंय. सूत्रसंचालक अनिल कपूर यांनी नॉमिनेशननंतर जनतेचा निर्णय ऐकवला. “बाहेरच्यांनी दोन स्पर्धकांना वाचवलं आहे. हे दोन स्पर्धक म्हणजे अरमान मलिक आणि दीपक चौरसिया. बिग बॉसच्या घरात साई केतन राव ‘बाहरवाला’ होता आणि त्याने सना सुलतानला एलिमिनेशनपासून वाचवलंय. आता घरातील नवीन ‘बाहरवाला’ लवकेश कटारिया बनला आहे,”

 

View this post on Instagram

 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

रविवारी पायलसोबतच लवकेश कटारिया आणि शिवानी कुमार हे दोघंसुद्धा नॉमिनेट झाले होते. ज्यावेळी अनिलने स्पर्धकांना विचारलं की घराबाहेर कोण जाऊ शकतं, तेव्हा सर्वांनी आत्मविश्वासाने सांगितलं की त्यांचे चाहते त्यांना एलिमिनेशनपासून वाचवतील. मात्र रणवीर शौरी आणि सई यांनी पायलच्या एलिमिनेशनची शक्यता वर्तवली होती.

अनिल कपूरने जेव्हा अरमानला पायलच्या एलिमिनेशनविषयी विचारलं, तेव्हा तो म्हणाला, “मी तयार आहे. जर ती एलिमिनेट झाली, तर ती घरी जाऊन आमच्या चार मुलांचा सांभाळ करेल. जर ती बिग बॉसच्या घरात राहिली तर तिने एलिमिनेट होण्यासारखं काही केलेलं नाही.” त्यावर अनिल कपूर त्याला म्हणतात, “चित भी मेरी और पट भी मेरी”. म्हणजेच दोन्ही बाजूने आपलाच विजय होणार असल्याचं अरमानने म्हटलंय.

‘बिग बॉस ओटीटी 3’मधून आतापर्यंत दोन स्पर्धक बाहेर पडले आहेत. बॉक्स नीरज गोयत याआधी बाद झाला होता. त्यानंतर आता अरमान मलिकची पहिली पत्नी पायलला घराबाहेर जावं लागलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;