Photo – बार्बाडोसच्या समुद्रकिनारी रोहीत शर्माचे विश्वचषकासोबत फोटोशूट
टीम इंडियाने शनिवारी रात्री सातासमुद्रापार वेस्ट इंडीजमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवित टी-20 वर्ल्ड कपच्या जगज्जेतेपदावर नाव कोरले. या विजयामुळे देशभरातली क्रिकेट चाहत्यांची तब्बल 11 वर्षांची प्रतिक्षा संपली. या सामन्यानंतर जगभरातील टीम इंडियाच्या चाहत्यांनी जल्लोष केला. अनेक ठिकाणी फटाके वाजवून, रॅली काढून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव झाला. दरम्यान रविवारी टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्माने बार्बाडोसच्या समुद्रकिनारी विश्वचषकासोबत फोटोशूट केले आहे.

About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List