‘कल्की’चा बॉक्स ऑफिसवर धुरळा
600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘कल्की 2898 एडी’ चित्रपट फुल वसुलीच्या मार्गावर आहे. प्रदर्शनानंतर तिसऱया दिवशी कल्कीने 200 कोटीच्या क्लबमध्ये एंट्री घेतली. अनेक भाषांमध्ये ‘कल्की 2898 एडी’ प्रदर्शित झालाय. तेलगू चित्रपटाने 126.9 कोटी, तामीळ 12.8 कोटी, हिंदी 72.5 कोटी, कन्नड 1.1 कोटी आणि मल्याळी भाषेत 6.7 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. पहिल्या दिवशी ‘कल्की’ने अॅडव्हान्स बुकिंगच्या जोरावर 50 कोटींहून अधिकची कमाई केली. दुसऱया दिवशी चित्रपटाच्या कमाईचा वेग कमी झाला. मात्र तिसऱया दिवशी कमाईत पुन्हा वाढ झाली. पहिल्या दिवशी चित्रपटाने सगळ्या भाषांमध्ये मिळून 95 कोटींची कमाई केली, तर हिंदी भाषेत ही कमाई 22 कोटींची होती. तिसऱया दिवशी हिंदी भाषेतील कमाई 27 कोटी होती. याचाच अर्थ बॉलीवूडचे प्रेक्षक चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List