विधान परिषद निवडणुकीचा आज निकाल

विधान परिषद निवडणुकीचा आज निकाल

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांवर झालेल्या निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर  मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी नेरूळ येथील आगरी-कोळी संस्कृती भवनामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून होणार आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेचे उमेदवार ऍड. अनिल परब आणि भारतीय जनता पक्षाचे किरण शेलार यांच्यात लढत झाली. अनिल परब यांना सुरुवातीपासूनच या मतदारसंघात पदवीधर मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे त्यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात चुरशीची लढत झाली असली तरी शिवसेनेचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर यांच्याही विजयाची खात्री व्यक्त केली जात आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या निरंजन डावखरे यांना यावेळी तिसऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी मिळाली असली तरी लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या विजयाचे पडसाद या निवडणुकीतही उमटून काँग्रेसचे रमेश कीर यांना लाभ होईल असा अंदाज आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातही शिवसेना उमेदवार संदीप गुळवे यांना मिंधे गटाच्या किशोर दराडे आणि अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांच्यातील मतविभाजनाचा लाभ मिळेल असे सांगितले जाते. नाशिकमध्ये अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;