सोनाक्षीचे झहीर इक्बालसोबत लग्न, शत्रुघ्न सिन्हा रूग्णालयात दाखल, पाच दिवसांपासून उपचार सुरूच, लेक म्हणाला..
शत्रुघ्न सिन्हा हे लेक सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात दिसले. त्यानंतर त्यांना थेट रूग्णालयात दाखल करण्यात आले. शत्रुघ्न सिन्हा हे गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात उपचार घेत आहेत.
रिपोर्टनुसार, जुहू येथील घरात सोफ्यावरून उठताना पडल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. पडल्यानंतर दोन दिवसांनी त्यांना त्रास व्हायला लागला आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.
दुसरीकडे शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव याने म्हटले की, पप्पांची तब्येत एकदम ठिक आहे. त्यांना रूटीन आणि फुल बॉडी चेकअपसाठी त्यांना रूग्णालयात आणले गेले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List