माझ्या निकाहनामाने क्रिकेटशी संबंधित चर्चेवरच घातली बंदी; शर्मिला टागोर यांचा खुलासा

माझ्या निकाहनामाने क्रिकेटशी संबंधित चर्चेवरच घातली बंदी; शर्मिला टागोर यांचा खुलासा

सध्याच्या घडीला देशभरात क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जितकी क्रेझ आहे, तितकीच क्रेझ एकेकाळी अभिनेत्री शर्मिला टागोर आणि दिवंगत क्रिकेटर टायगर पतौडी यांच्याविषयी होती. दोघंही पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रातील होते आणि आपापल्या क्षेत्रात त्यांनी चांगलं यश कमावलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिला याविषयी व्यक्त झाल्या. माझ्या ‘निकाहनामा’मध्ये क्रिकेटशी संबंधित सर्व चर्चेतून मला बंदी घालण्यात आली होती, असं त्यांनी गंमतीत सांगितलं. शर्मिला यांना क्रिकेटविषयी फारसं काही समजायचं नाही. वकील आणि राजकारणी कपिल सिब्बल यांना दिलेल्या मुलाखतीत त्या याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या.

“फिल्म इंडस्ट्री ही सातत्याने बदलतेय आणि कमी बजेटच्या चित्रपटांचं कथानक चांगलं असेल तरी त्याकडे प्रेक्षकवर्ग खेचला जाऊ शकतो”, असं शर्मिला म्हणतात. चित्रपटांविषयी बोलत असताना कपिल सिब्बल त्याची तुलना क्रिकेटविश्वाशी करू लागतात. आयपीएल आणि फिल्म इंडस्ट्रीतील समानतेविषयी ते बोलत असताना शर्मिला हसून म्हणतात, “मला वाटत नाही की क्रिकेटबद्दल बोलण्यासाठी मी पात्र आहे. मी क्रिकेटविषयी कधीच काही चर्चा करणार नाही, असं माझ्या निकाहनामामध्ये लिहिलं होतं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

शर्मिला यांनी दिग्गज क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी लग्न केलं होतं. “आमची भेट कोलकातामध्ये एका क्रिकेट पार्टीदरम्यान झाली होती. त्यावेळीच आम्ही एकमेकांचे टेलिफोन नंबर्स मागितले होते. टायगर पतौडी यांनी माझ्यासोबत एक प्रँक केला होता. तेव्हाच त्यांनी मला कॉफी प्यायला येशील का, असं विचारलं होतं. तिथूनच माझ्या संवादाची सुरुवात झाली”, असं त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सांगितलं होतं. टायगर पतौडी यांनी पॅरिसमध्ये शर्मिला यांना लग्नासाठी प्रपोज केलं होतं. “आम्ही पॅरिसमध्ये होतो आणि त्यादिवशी तिथे सर्वजण रस्त्यावर स्वातंत्र्याचा दिवस साजरा करत होते. तेव्हाच एखाद्या चित्रपटातील सीनप्रमाणे त्यांनी गुडघ्यावर बसून मला लग्नासाठी प्रपोज केलं होतं”, असं त्यांनी सांगितलं. त्याकाळी या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. 27 डिसेंबर 1968 रोजी या दोघांनी लग्न केलं होतं. शर्मिला आणि टायगर यांना सैफ अली खान, सबा अली खान, सोहा अली खान ही तीन मुलं आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;