केदारनाथमध्ये गांधी सरोवरवर हिमस्खलन

केदारनाथमध्ये गांधी सरोवरवर हिमस्खलन

उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ परिसरात हिमस्खलन झाल्याची माहिती समोर आली आहे. गांधी सरोवरवर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हिमस्खलन झाले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील हिमस्खलनाचे दृश्य पाहून अनेकांचा थरकाप उडत आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

काही दिवसांपूर्वीच शास्त्रज्ञांनी हिमालयाच्या उंच भागातील हिमनद्या वितळू लागल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याला काही दिवस उलटत नाही तोच हिमस्खलन घडले आहे. देशभर प्रसिद्ध झालेल्या केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी हिमस्खलनाच्या घटनेचा व्हिडीओ बनवला आहे.

केदारनाथमधील चोरबारीवर हिमालयात ही घटना घडली. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये हिमनदी तुटल्याने बर्फाचा ढग उसळला आणि काही वेळातच तो खोल दरीत कोसळला. उत्तराखंडमध्ये अनेक हिमनद्या सतत वितळत आहेत. त्यांचा वितळण्याचा वेग अधिक आहे. हिमनद्या दरवर्षी 15 ते 20 मीटरने वितळत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;