Video जुहू चौपाटीवर बुडणाऱ्या दोघांना लाईफगार्डने वाचवले, पाहा थरारक व्हिडीओ

Video जुहू चौपाटीवर बुडणाऱ्या दोघांना लाईफगार्डने वाचवले, पाहा थरारक व्हिडीओ

सध्या पावसाच्या दिवसात समुद्रापासून दूर रहा असे आवाहन अनेकदा प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र तरिही काही अतिहौशींना उधळलेल्या समुद्रात पोहण्याचा मोह आवरत नाही. अशाच दोघांना आज जुहू चौपाटीवरील लाईफगार्ड्सनी बुडता बुडता वाचवले. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

जुहू चौपाटीवर अथर्व (17) व श्रेयस (16) ही अल्पवयीन मुलं आपल्या मित्रांसोबत पोहोयला समुद्रात गेले होते. आज मुंबईत मुसळधार पावासचा इशारा तसेच समुद्रात मोठ्या लाटा उसळणार असल्याचा इशारा दिलेला असतानाही हे मुलगे लाईफगार्ड्सची नजर चुकवून समुद्रात गेले. तिथे पोहत असताना अचानक मोठ्या लाटेत अथर्व व श्रेयस बुडू लागले. त्यांच्या इतर मित्रांनी आरडा ओरड करून लाईफगार्ड्सला बोलावले. त्यानंतर लाईफगार्ड्सनी बुडणाऱ्या मुलांकडे धाव घेत त्यांना वाचवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;