‘सुख कळले’मध्ये नवा ट्विस्ट; नव्या पात्राच्या एण्ट्रीने वाढणार प्रेक्षकांची उत्कंठा
कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुख कळले' या लोकप्रिय मालिकेच्या कथानकात आता रंजक वळण येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे. एकीकडे माधवच्या आकस्मिक निधनानंतर मिथिलाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे.
दुसरीकडे कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्यांचा डोलारा स्वतःच्या खांद्यावर घेत ती पुन्हा एकदा नोकरी करण्याचा निर्णय घेणार आहे. घर आणि नोकरी दोन्ही सांभाळणारी एक खंबीर मिथिला आपल्याला नव्याने पाहायला मिळणार आहे.
'सुख कळले' मालिकेत आता एका नव्या पात्राची एण्ट्री होत आहे. हे पात्र मिथिलाच्या खडतर प्रवासात तिची मदत करेल का? की तिचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणार? हे पात्र सकारात्मक की नकारात्मक असणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List