VIDEO : … जेव्हा बायकोच घेते जसप्रीत बुमराहची मुलाखत

VIDEO : … जेव्हा बायकोच घेते जसप्रीत बुमराहची मुलाखत

टीम इंडियाने पुन्हा एकदा 17 वर्षानंतर टी-20 वर्ल्डकपचे जेतेपद आपल्या नावावर केले आहे. या संपूर्ण विश्वचषकात टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात जसप्रीत बुमराहचा सिंहाचा वाटा होता असे बोलायला हरकत नाही. विजयानंतर सर्व खेळाडू आपल्या कुटुंबियांसोबत पत्नीसोबत आपला आनंद शेअर करत असताना जसप्रीत बुमराह मात्र त्याच्या पत्नीला मुलाखत देताना दिसला.

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही आयसीसीकडून क्रिकेटचे समालोचन करत होती. त्यामुळे सामना संपल्यानंतर ती सर्व खेळाडूंच्या मुलाखती घेताना दिसली. जसप्रीत बुमराहची देखील तिने अगदी प्रोफेशनलपणे मुलाखत घेतली. मात्र नंतर जाताना जसप्रीतने तिला मिठी मारली. त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जसप्रीत त्याचा मुलगा अंगदसोबत खेळतानाही दिसत आहे.

दक्षिण आफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावांची गरज होती आणि तेव्हाच रोहीत शर्माने चेंड़ू अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या हाती दिला. आधीच्याचा ओव्हरमध्ये हेनरिच क्लासेनने अक्षर पटेलच्या ओव्हरला तुफान फलंदाजी केलेली त्यामुळे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे पारडे जड झाले होते. अशातच बुमराहने संयमी पण तितकीच प्रभावी गोलंदाजी केली व टीम इंडियाला पुन्हा सामन्यात परत आणले. पंधराव्या षटकात बुमराहने फक्त चार धावा दिल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेवरचे दडपण वाढले. त्यानंतरच्या सतराव्या षटकात पुन्हा बुमराह गोलंदाजीला आला त्यावेळी त्याने दोन धावा देत जेसनला बोल्ड केले. जसप्रीतने दक्षिण आफ्रिकेचा विजयचा मार्ग दूर केला व टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;