चंद्रपूर – प्रेयसीचा खून करणाऱ्या आरोपीने पोलीस कोठडीत संपविले जीवन
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध आनंदवनात मागील आठवड्यात झालेल्या युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव समाधान माळी असे आहे. वरोरा येथे 26 जून रोजी आरती दिगंबर चंद्रवंशी (वय 25) या युवतीची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवित आरोपी समाधान माळी याला चोवीस तासात अटक केली.
आरतीच्या हत्येमागे लव्ह – ब्रेकअप – मर्डर असे वळण असल्याचे पोलीस तपासात समोर आले. आरोपी समाधानला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आरोपी समाधान माळी हा कुष्ठरोगी असून, तो एक वर्षाआधी आनंदवनात उपचाराला आला होता. तिथेच त्याचा परिचय आरतीशी झाला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान, आरोपीने रात्री पोलीस कोठडीत गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List