लै भारी! रांगड्या श्टाईलनं होणार कल्ला; ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोवर सेलिब्रिटींकडून कमेंट्सचा वर्षाव

लै भारी! रांगड्या श्टाईलनं होणार कल्ला; ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोवर सेलिब्रिटींकडून कमेंट्सचा वर्षाव

‘बिग बॉस’ म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर जगभरात बोलबाला असलेला मनोरंजनाचा बादशाह. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम. ‘कलर्स मराठी’ आणि जिओ सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनची नुकतीच घोषणा करण्यात आली. गेली दोन वर्षे प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या ‘बिग बॅास’ मराठीची प्रतीक्षा आता संपली आहे. नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या पर्वाची घोषणा होताच सोशल मीडियावर लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. विशेष म्हणजे हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा अभिनेता आणि महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख या सिझनचं सूत्रसंचालन करणार आहे. बिग बॉस मराठीच्या या नव्या प्रोमोवर सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

रितेशने आजवर त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना ‘वेड’ लावलं आहे. पण आता टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला आणि ‘बिग बॉस’ मराठीचा हा नवा सिझन गाजवायला तो सज्ज झाला आहे. रितेशच्या येण्याने ‘बिग बॉस’च्या घरात जबरदस्त कल्ला होणार आहे. या प्रोमोमध्ये रितेशचा रूबाब अन् त्याची ‘लय भारी’ स्टाईल पाहायला मिळत आहे. रितेशची ‘बॉस’गिरी पाहण्याची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. ‘बिग बॉस’मध्ये आतापर्यंत एका वेगळ्या पद्धतीचे खेळ, नियम आणि टास्क होते. पण आता रितेशच्या येण्याने नावीन्य येणार असल्याचं प्रोमोवरुन स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच तर रितेश म्हणतोय,”आता मी आलोय… कल्ला तर होणारच!”

पहा प्रोमो-

 

View this post on Instagram

 

A post shared by @colorsmarathi

या नव्या प्रोमोवर मराठी कलाकारांनी आणि बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘आता सुट्टी नाय तर कुट्टी होणार. जाळ आणि धूर.. टीमला शुभेच्छा. जोतिबाच्या नावानं चांगभलं, रामकृष्ण हरी, माऊली’, असं विशाल निकमने लिहिलंय. तर ‘जो नीट नाही वागणार त्याला माऊली बघणार. कोणी हसणार, कोणी रुसणार, कोणी डोळे पुसणार. कितीही मेकअप करा खरा चेहरा दिसणार,’ असं उत्कृर्ष शिंदेनं म्हटलंय. किरण माने यांनी लिहिलं, ‘लै भारी! कल्ला तर झालाच पायजे रितेशभाऊ, तो पण आपल्या रांगड्या श्टाईलनं!’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;