पतौडी पॅलेसच्या टेरेसवर पलक तिवारीने काढले फोटो? इब्राहिमच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतेच पलकने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष तर वेधलंच आहे, पण पलकच्या फोटोंनी आणखी एका खास व्यक्तीचं लक्ष वेधलं आहे, तो म्हणजे इब्राहिम अली खान.
पलकच्या या फोटोंवर सर्वांत आधी सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानने कमेंट केली आहे. 'लुकींग गुड' (छान दिसतेय) असं लिहिलेला फायरचा इमोजी त्याने पोस्ट केला आहे. मात्र थोड्या वेळानंतर त्याने ही कमेंट काढून टाकली.
पलकच्या फोटोंची चर्चा आणखी एका कारणामुळेही होत आहे. तिने ज्याठिकाणी हे फोटो काढले आहेत, ते पतौडी पॅलेस असल्याचा अंदाज काही नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. पतौडी पॅलेस हे सैफ अली खानचं वडिलोपार्जित घर आहे. तिथे पलकचे फोटो खुद्द इब्राहिमनेच काढल्याचं म्हटलं जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List