T20 WC 2024 : जय शहा यांची भविष्यवाणी खरी ठरली, बार्बाडोसमध्ये हिंदुस्थानचा झेंडा फडकलाच!

T20 WC 2024 : जय शहा यांची भविष्यवाणी खरी ठरली, बार्बाडोसमध्ये हिंदुस्थानचा झेंडा फडकलाच!

हिंदुस्थानी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत टी-20 वर्ल्ड कप जिंकून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या कामगिरीबद्दल देशभरात हिंदुस्थानी संघाचे तोंड भरून कौतुक होत आहे. मात्र या विजयानंतर आणखी एका गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे जय शहा यांच्या भविष्यवाणीची. जय शहा यांनी टी-20 वर्ल्ड कप हा हिंदुस्थानकडेच येणार अशी भविष्यवाणी केली होती. ही भविष्यवाणी खरी ठरली असून, हिंदुस्थानने खरोखरच ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

राजकोट येथे 14 फेब्रुवारी रोजी एक इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या इव्हेंटमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी टी-20 वर्ल्ड कपबाबत भविष्यवाणी केली होती. “2023 मध्ये भलेही वर्ल्ड कप जिंकू शकलो नाही. पण रोहित शर्माच्या नेतृत्वात हिंदुस्थानी संघ टी20 वर्ल्ड कप जिंकून बार्बाडोसमध्ये तिरंगा फडकावेल”, असे जय शहा म्हणाले होते. आणि बरोबर चार महिन्यांनी शहा यांची भविष्यवाणी खरी ठरली असून, हिंदुस्थानी संघाने बार्बाडोसमध्ये तिरंगा फडकवला आहे. यानंतर शहा यांच्या भविष्यवाणीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;