मराठी अस्मिता, कायदा सुव्यवस्था, शेतकरी हित जपण्यात सरकार अपयशी; राज्यपालांच्या भाषणावर विरोधी पक्षनेत्यांचा आक्षेप

मराठी अस्मिता, कायदा सुव्यवस्था, शेतकरी हित जपण्यात सरकार अपयशी; राज्यपालांच्या भाषणावर विरोधी पक्षनेत्यांचा आक्षेप

मराठी अस्मिता, कायदा सुव्यवस्था, शेतकऱयांचे हित जपण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. उद्योग क्षेत्राला महायुती सरकार मागे नेत असून काल तुटीचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे राज्यपालांचे अभिभाषण हे राज्याच्या हिताचे नाही, अशा शब्दात राज्यपालांच्या अभिनंदनपर ठरावाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत विरोध दर्शविला.

राज्यपालांच अभिभाषण हे निरस आहे. त्यांच्या अभिभाषणात सरकारच्या कामाचा प्रतिबिंब आलं पाहिजे. मात्र हे अभिभाषण दिशाहीन, अर्थहीन व भरकटलेलं असल्याची टीका दानवे यांनी केली. गेल्या 20 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित महाराष्ट्र सीमा कर्नाटक प्रश्न, राज्यातील उद्योगधंद्यांची प्रगती, दावोसमधील गुंतवणुक व परराज्यात गेलेल्या उद्योगांवरून दानवे यांनी सरकारवर तोफ डागली. असंघटित कामगार मंडळ हे सत्ताधाऱयांनी त्यांच्या हितासाठी निर्माण केलं. कामगारांच्या खात्यात थेट रक्कम देणारं धोरण सरकार आणत का नाही असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरात लवकर देण्यात यावा, अशी मागणी दानवे यांनी केली.

मराठी भाषा विद्यापीठ कागदावरच

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा उल्लेख करण्यात आला मात्र अद्याप ते कागदावरच आहे. पैठणसाठी संत विद्यापीठ घोषित करण्यात आले परंतु त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही. राज्यात व पेंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना सुद्धा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नाही.  मराठी भाषेकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;