तिजोरीत खडखडाट आणि थापांचा सुळसुळाट; विरोधकांची घोषणाबाजी, विधान भवन दुमदुमले
‘महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प म्हणजे तिजोरीत खडखडाट अन् थापांचा सुळसुळाट’, ‘बजेटमधून विधानसभेच्या तयारीच्या येतोय वास…’ या घोषणांनी आज विधान भवनाचा परिसर दणाणला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधान भवनाच्या पायऱयांवर आज जोरदार निदर्शने करत महायुतीच्या अर्थसंकल्पाची पोलखोल केली. ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’, ‘लुटारू सरकार हाय हाय’, ‘40 टक्के कमिशन घेणाऱया सरकारचा धिक्कार असो’ या घोषणातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पाची पोलखोल केली. या घोषणांचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List