भीमनगर झोपडपट्टीवरील कारवाईची चौकशी होणार; विधानसभा अध्यक्षांचे आदेश

भीमनगर झोपडपट्टीवरील कारवाईची चौकशी होणार; विधानसभा अध्यक्षांचे आदेश

पवई येथील भीमनगर परिसरातील झोपडपट्टीवर महापालिकेने केलेल्या कारवाईची चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. पवई येथील भीमनगर परिसरातील झोपडय़ांवरील कारवाईबाबतचा प्रश्न काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे उपस्थित केला. या ठिकाणी 650 गरीब, मागासवर्गीय कुटुंबांवर 6 जूनच्या रात्री पोलीस बंदोबस्तात कारवाई करून या कुटुंबांना बेघर करण्यात आले आहे. आज ही सर्व कुटुंबं रस्त्यावर आहेत. पोलीस व मुंबई पालिका प्रशासनाच्या माध्यमातून चुकीची कारवाई करून या मागासवर्गीय लोकांना बेघर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस ताफा वापरून मागासवर्गीयांवर अन्याय केला आहे. गर्भवती स्त्रियांना मारले, 14 वर्षांच्या मुलाला मारले. स्वतःला बुलडोझर बाबा म्हणता आणि गरीबावर बुलडोझर चालवता ही हुकूमशाही असल्याचा आरोप करीत याप्रकरणी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणीही वडेट्टीवार यांनी केली. याप्रकरणी कारवाईसाठी  विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला. त्यानंतर या सर्वांची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चौकशीचे आदेश दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;