‘तिकळी’ मालिकेत किरण माने साकारणार खलनायकाची भूमिका
सन मराठी या वाहिनीवर ‘तिकळी’ रहस्यमय मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या प्रोमोंमधून अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर, पूजा ठोंबरे, अभिनेता पार्थ घाटगे या मालिकेत विशेष भूमिका साकारणार आहेत तर किरण माने ‘बाबाराव’ नावाचे पात्र साकारणार असल्याचे समजले आहे. बाबाराव हा गावचा खोत असून त्याचा गावावर वचक आहे. पण बाबाराव आणि तिकळी यांचा नेमका संबंध काय किंवा त्यांचं समीकरण नेमकं कुठे जुळतंय हे प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच कळेल. मालिका सुरु झाल्यावर हळू-हळू जसं रहस्य उलगडत जाईल तसंच मालिका प्रदर्शित होईपर्यंत या मालिकेत अजून कोण कलाकार आहेत याचा ही उलगडा ‘सन मराठी’ करत राहील. ‘तिकळी’ ही मालिका 1 जुलै पासून सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता फक्त ‘सन मराठी’वर प्रदर्शित होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List