शहनाज गिल ‘या’ अभिनेत्याला करत आहे गुपचूप डेट, सलमान खान याने…

शहनाज गिल ‘या’ अभिनेत्याला करत आहे गुपचूप डेट, सलमान खान याने…

बिग बॉस फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात धमाका करताना शहनाज गिल दिसली. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातूनच शहनाज गिल हिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. शहनाज गिल हिच्याकडे अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर असल्याचेही सांगितले जाते. शहनाज गिल सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना शहनाज गिल कायमच दिसते. शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बॉसच्या घरातूनच मिळालीये.

शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या जोडीला प्रेक्षकांनी प्रेम दिले. हेच नाही तर बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतरही शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला हे एकमेकांना डेट करताना दिसले. शहनाज गिल आणि सिद्धार्थ लवकरच लग्न करणार असल्याचेही सांगितले जात होते. मात्र, अचानक सिद्धार्थ शुक्ला याने जगाचा निरोप घेतला.

सिद्धार्थच्या निधनानंतर पूर्णपणे तुटलेली शहनाज गिल ही दिसली. गेल्या काही दिवसांपासून शहनाज गिल हिचे नाव अभिनेता आणि कोरियोग्राफर राघव जुयाल याच्यासोबत जोडले जात आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जातंय. हेच नाहीतर याबद्दलची मोठी हिंट थेट सलमान खान यानेच दिली होती.

राघव जुयाल आणि शहनाज गिल यांच्याकडून पापाराझींच्या नजरेला पडू नये, यासाठी खास काळजी घेतली जात असल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर एकसोबत स्पॉट होणार नाहीत, यासाठी दोघे वेगवेगळे फिरताना दिसत आहेत. यासोबतच जेवणासाठी बाहेर जाताना ते वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जात असल्याचेही सांगितले जातंय.

राघव जुयाल आणि शहनाज गिल हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनमुळे चर्चेत आहेत. मात्र, अजूनही राघव जुयाल आणि शहनाज गिल यांनी त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले नाहीये. मात्र, दोघे रिलेशनमध्ये असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. शहनाज गिल मुळ पंजाबची आहे. बिग बॉसनंतर शहनाज गिल ही मुंबईमध्येच स्थायिक झालीये.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;