ना एक चित्रपट ना जाहिरात, अमिताभ बच्चन यांची नात देणार 1000 महिलांना रोजगार आणि…

ना एक चित्रपट ना जाहिरात, अमिताभ बच्चन यांची नात देणार 1000 महिलांना रोजगार आणि…

अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली नंदा ही कायमच चर्चेत असते. नव्या नवेली नंदा ही सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. नव्या नवेली नंदा ही बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार का? हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मात्र, प्रत्येकवेळी बच्चन कुटुंबाकडून हे स्पष्ट करण्यात आले की, नव्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणार नाहीये. नव्या नवेली नंदा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या शोच्या माध्यमातून अनेक मोठे खुलासे करताना नव्या दिसली आहे. हेच नाही तर आजोबा अमिताभ बच्चन यांच्या काैन बनेंगा करोडपती या शोमध्येही काही दिवसांपूर्वीच नव्या ही सहभागी झाली होती.

लवकरच नव्या नवेली नंदा ही तब्बल 1000 महिलांना रोजगार मिळून देणार आहे. होय तुम्ही खरे ऐकले आहे, नव्या तब्बल 1000 महिलांना रोजगार देणार आहे. विशेष म्हणजे नव्याने आतापर्यंत एकही चित्रपट किंवा जाहिरात केली नाहीये. मात्र, 26 व्या वर्षी ती 1000 महिलांना रोजगार मिळून देणार आहे. लोक अमिताभ बच्चन यांच्या नातीचे काैतुक करताना दिसत आहेत.

नव्या एका एनजीओशी जोडली गेली आहे. सम्यक चक्रवर्ती फाऊंडेशनशी हातमिळवणी करून स्मार्ट फेलोशिप सुरू नव्याने केलीये. यामध्ये महिलांना विशेष कौशल्ये शिकवली जाणार आहेत. याच्या माध्यमातून 1000 महिलांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगार मिळून दिला जाणार आहे. याबद्दल बोलताना नव्या म्हणाली की, मी बऱ्याच वर्षांनंतर लखनऊला आले. 

मी माझा प्रकल्प घेऊन लखनऊला आले, याचा मला आनंद आहे. येथील महिलांना कामाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी खूप जास्त उत्सुक नक्कीच आहे. पुढे नव्याने म्हटले की, मुळात म्हणजे आजच्या युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

गावागावातून आणि  शहरांमधून महिलांना एकत्र करून त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार काम उपलब्ध करून देणे हे आमच्या प्रकल्पाचे मुळ उद्धिष्ट आहे. विशेष म्हणजे विविध जीवनशैलीतील महिला या आमच्या प्रकल्पाचा भाग आहेत. मुळात म्हणजे याची आज गरज आहे. महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत. हेच नाहीतर आज देशाच्या राष्ट्रपती एक महिला आहेत. व्यवसाय आणि उद्योगांमध्येही महिलांचा कल वाढत आहे, असेही नव्याने म्हटले. 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;