“पतीला घरीच दारु प्यायला सांगा, लाटणं दाखवा”; भाजपच्या मंत्र्याचा महिलांना अजब सल्ला

“पतीला घरीच दारु प्यायला सांगा, लाटणं दाखवा”; भाजपच्या मंत्र्याचा महिलांना अजब सल्ला

मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री नारायण सिंह कुशवाह सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. भोपाळमध्ये आयोजित एका नशामुक्ती कार्यक्रमात कुशवाह यांनी भाषणात दारूचे व्यसन सोडवण्यासाठी महिलांना एक अजब सल्ला दिला आहे. ‘पतीची दारू सोडवायची असल्यास त्याला घरीच दारू प्यायला सांगा, दारू पिऊन आल्यास पतीला लाटणं दाखवा’, असा सल्ला मध्य प्रदेशचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री नारायण सिंह कुशवाह यांनी दिला. कुशवाह यांच्या या सल्ल्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

‘पतीने दारु सोडावी, असे माझ्या माता-भगिनींना वाटत असेल तर सर्वप्रथम त्यांना दारू घरी आणून तुमच्यासमोर प्यायला सांगा. त्यांना हे ही सांगा की तुम्हाला पाहून मुलंही दारू पितील. यामुळे त्यांना स्वतःला लाजिरवाणे वाटेल आणि ते तुमच्यासमोर कमी दारू पितील. मग हळूहळू दारू सोडतील’, असे कुशवाह यांनी म्हटले आहे.

तसेच ‘जे पती बाहेरून दारू पिऊन येतात त्यांना लाटणं दाखवा, जेवण देऊ नका. तुमची लाटणं गँग बनवा. सामाजिक संस्कारांमुळे अनेक महिला असं करत नाहीत, मात्र चुकीच्या गोष्टी रोखायच्या असतील तर संस्कार बाजूला ठेवा. ज्या राज्यात दारूबंदी आहे, तिथेही चोरून दारू विक्री केली जाते. त्यामुळे दारूबंदी जनजागृती हा एकमेव उपाय आहे’, असेही कुशवाह यांनी सांगितले.

कुशवाह यांच्या सल्ल्यावर काँग्रेसने आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुशवाह यांचा उद्देश चांगला आहे पण सल्ला चुकीचा आहे. पती घरी दारू प्यायला तर ते घर क्लेषाचं केंद्र बनेल आणि घरगुती हिंसाचार वाढेल. त्यामुळे त्यांनी दारू पिऊ नका, असा सल्ला द्यायला पाहिजे होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;