स्त्री पुरुष समानता केवळ कागदावर…जगभरातील सत्तेत महिलांचा वाटा नगण्य
स्त्री पुरुष समानतेवर कितीही चर्चा झाल्या तरी मात्र अद्याप तो टप्पा गाठायला बराच काळ जाणार आहे. राजकीय क्षेत्राचा विचार केला तर 113 देशांमध्ये तर एकही महिला कधी राष्ट्राध्यक्ष झाली नाही किंवा सरकारच्या प्रमुख पदावर पोचली नाही. एवढेच नव्हे तर 141 देशांमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून महिलांचा वाटा एकही तृतीयांशपेक्षाही कमी आहे. युएन वुमनच्या वतीने हा अहवाल जारी करण्यात आलाय.
2022 च्या आकडेवारीनुसार, जगाच्या लोकसंख्येत महिलांची संख्या 49.7 टक्के आहे. असे असले तरी सत्तेचा मार्ग त्यांच्यासाठी मर्यादित आहे. महिलांचे मर्यादित प्रतिनिधीत्व निम्म्या लोकसंख्येच्या दृष्टीने चिंताजनक आहे. हळूहळू परिस्थिती बदलतेय. मात्र तरीही राजकीय सत्ता आणि रणनितीपासून महिला खूप दूर आहेत. निर्णय घेण्याच्या बाबतीत पुरुषांचा दबदबा आहे, असे अहवालात म्हटले आहे.
सध्या केवळ 26 देशांची धुरा महिलांकडे आहे. जगात केवळ 23.3 टक्के मंत्रीपदे महिलांकडे आहेत. सात देशांच्या
कॅबिनेटमध्ये तर एकही महिला नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List