मालदीवच्या राष्ट्रपतींवर काळय़ा जादूचा प्रयोग?

मालदीवच्या राष्ट्रपतींवर काळय़ा जादूचा प्रयोग?

मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांच्यावर काळी जादू करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा आहे. याप्रकरणी मालदीवचे पर्यावरण राज्यमंत्री फातीमाथ शमानाझ यांना अटक करण्यात आली आहे. फातिमाथव्यतिरिक्त आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने सर्वांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र याप्रकरणी मालदीव सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. पोलिसांनी फातिमाथ यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांना काळय़ा जादूशी संबंधित अनेक वस्तू सापडल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. फातिमाथ या राष्ट्रपती कार्यालयात काम करणारे मंत्री ऍडम रमीझ यांच्या पत्नी आहेत. याआधी फातिमाथ अध्यक्ष मुइज्जू यांच्यासह मालेच्या सिटी कौन्सिलच्या सदस्य होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;