कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीवर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला विकी कौशल, गुड न्यूज बाबत म्हणाला..

कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीवर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला विकी कौशल, गुड न्यूज बाबत म्हणाला..

अभिनेता विकी कौशलसाठी हे वर्ष एकंदरच खूप चांगल गेलंय. सॅम माणेकशॉ चित्रपटातील त्याचा कामाचं खूप कौतुक झालं. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचं अभिनयाचं नाणं खणखणीत वाजत असून त्याच्या हातात छावा, संजय लीली भन्साळी यांचा आगामी चित्रपट यासह अनेक महत्वपूर्ण प्रोजेक्ट्स आहेत. तो रोमँटिक कॉमेडी चित्रपटातही तितंकच उत्तम काम करतो. आणि असाच एक चित्रपट तो प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन येत आहे. त्याच्या आगामी ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाचा ट्रेलर 28 जून रोजी लाँच झाला. या चित्रपटात विकी कौशल याच्यासह, तृप्ती डिमरी हिचीदेखील प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरदरम्यान विकी कौशल वैयक्तिक आयुष्याबद्दल काही प्रश्न देखील विचारण्यात आले. त्यावर अभिनेत्याने दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा आहे.

खरंतर ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला तेव्हा काही पत्रकारांनी विकीला त्याची पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या प्रेग्नन्सीबद्दल प्रश्न विचारला. त्याच्या उत्तराने पॅप्सची बोलतीच बंद झाली. विकी-कतरिनाच्या लग्नाला ता जवळपास तीन वर्ष होत आली आहेत. कतरिना कैफ ही गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. विकी-कतरिना लंडनमध्ये फिरत असताना या दोघांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी तिची चाल, तिचे कपडे यावरून चाहत्यांनी अनेक तर्क वितर्क व्यक्त केले. कतरिनाच्या प्रेग्नन्सीबद्दल विकीला पहिल्यांदाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्ट उत्तर दिले.

खरी गुड न्यूज कधी देणार ?

‘बॅड न्यूज’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी, पत्रकारांनी विकी कौशलला विचारले की , खरी गुड न्यूज कधी येणार ? तो प्रश्न ऐकून इतर कलाकारांसह विकी कौशलही हसू लागला.त्यानंतर तो म्हणाला, ‘जेव्हा (ती गुड न्यूज) येईल तेव्हा मी तुम्हा सर्वांना सांगेन, पण सध्या तरी आम्ही आणत असलेल्या या ‘बॅड न्यूज’ (चित्रपटाचा) तुम्ही आनंद घ्या. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सर्वांना नक्कीच सांगेन.’असे विकीने स्पष्ट केले. ‘बॅड न्यूज’च्या ट्रेलर लाँचला या चित्रपटाशी संबंधित प्रत्येकजण उपस्थित होता. पण कार्यक्रमादरम्यान, मीडियाने विकी कौशलला खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून सर्वच हसू लागले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by VickyKatrina16 🍉 (@vickykatrina16)

कधी रिलीज होणार ‘बॅड न्यूज’?

‘बॅड न्यूज’ या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली झाली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. आनंद तिवारी हा एक अभिनेताही असून आता दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. बॅड न्यूज हा चित्रपट 19 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर सर्वांनाच आवडला आहे. या चित्रपटात विकी कौशलशिवाय तृप्ती डिमरी आणि एमी विर्क हे दोघेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;