त्यांनी आमचा घसका घेतलाय; अर्थसंकल्पावरून शरद पवारांचा मिंधे सरकारला टोला

त्यांनी आमचा घसका घेतलाय; अर्थसंकल्पावरून शरद पवारांचा मिंधे सरकारला टोला

अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. तिजोरीत खडखडाट असल्याने एकीकडे कर्ज काढून खर्च भागवावा लागत असताना केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा गडगडाट मिंधे सरकारने केला. विरोधकांनीही याचा खरपूस समाचार घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर परखड शब्दात टीका केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अर्थसंकल्पावरून मिंधे सरकारवर टीकेचे बाण सोडले.

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी वर्तमानपत्रामध्ये अनेक गोष्टी, तरतुदी छापून आल्या होत्या. याचाच अर्थ अर्थसंकल्पाची गुप्तता ठेवली गेली नाही. ज्या गोष्टी प्रत्यक्षात कृतीत येणार नाही त्या गोष्टींची मांडणी अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. हा अर्थसंकल्प तीन महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मांडण्यात आला आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, अर्थसंकल्पातील तरतुदी लोकांपर्यंत पोहोचायला कित्येक महिने जातील. कारण एकंदर जमा, महसुली तूट आणि लागणारी आवश्यकता या तीन गोष्टींची आकडेवारी पाहिल्यास आवश्यकतेपेक्षा कितीतरी कमी रक्कमेची उपलब्धता असल्याचे जाणवते. हा अर्थसंकल्प म्हणजे लोकांना आपण काहीतरी भयंकर करतोय असे दाखवणारा आहे. पण लोकांचा यावर विश्वास बसणार नाही. विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा अर्थसंकल्प मांडला असला तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कितपत होईल, अशी शंका शरद पवार यांनी व्यक्त केली.

मी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करतोय, त्यामुळे सगळ्या बाबी लक्षात घेऊनच अर्थसंकल्प सादर केल्याचे विधान अजित पवार यांनी केले. याचाही शरद पवार यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, एखाद्या गोष्टीला 100 रुपये खर्च होणार असतील आणि खिशात 70 रुपये आहेत, तर खर्च करणार कसा? तुमच्याकडे महसुली जमा किती आहे. महसुली खर्च किती होणार आहे आणि जमेपेक्षा अधिक खर्च करू म्हणत जो गॅप राहणार आहे तो कसा भरणार याची तरतूद न करता आम्ही खर्च करू म्हणणे याला अर्थ नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला.

मिंधे सरकारचा अर्थसंकल्प! खिशात नाही आणा, मला ‘दादा’ म्हणा!! तिजोरीत खडखडाट, पण घोषणांचा गडगडाट!!!

लाडकी बहीण योजना, कृषी वीज बिल माफ याचा सरकारला फायदा होईल का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, प्रत्यक्ष याची अंमलबजावणी होईल का? वीजमाफीच्या निर्णयाबाबत बोलायचे झाल्यास आज वीज मंडळाची स्थिती काय आहे? त्यांना जर तोटा होतोय, तर तो भरून काढण्याची तरतूद नाही. त्यानंतरही वीजमाफीसारखे निर्णय राबवले जाणार असतील तर शंका उपस्थित होणारच. शिवाय नव्या योजनांसाठी सरकार आम्ही कर्ज काढणार म्हणत आहे. पण राज्यावर कर्जाचा किती बोझा आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यात ही आणखी भर, असेही पवार म्हणाले.

हा अर्थसंकल्प म्हणजे लबाडाघरचे निमंत्रण! उद्धव ठाकरे यांनी सरकारला थोबडवले

आमचा घसका घेतलाय

लोकसभेला महाराष्ट्रात 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. 30 जागांवर थेट विजय मिळाला आणि एक सांगलीची जागा. त्यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला असून लोकसभेत ते आमच्यासोबत बसले आहेत. यावरून लोकांचा कल काय आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यांनी आमचा धसका घेतला असून त्यातूनच हा अर्थसंकल्प सादर केला, असा घणाघात पवारांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;