समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन कार एकमेकींवर धडकल्या; सात जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन कार एकमेकींवर धडकल्या; सात जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर दोन कार एकमेकींवर धडकल्याने भीषण अपघाताची घटना शुक्रवारी रात्री जालना येथे घडली. इर्टिका आणि स्विफ्ट डिझायर कार धडकल्याने अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इर्टिका कार नागपूरहून मुंबईला येत होती. महामार्गावरील जालना येथील कदावंची गावाजवळ गाडीत पेट्रोल भरल्यानंतर इर्टिका विरुद्ध दिशेने येत होती. याचदरम्यान स्विफ्ट डिझायर वेगाने समोरून आल्याने दोन्ही कार एकमेकींवर धडकल्या. धडक इतकी जोरदार होती की कारमधील प्रवासी बाहेर रस्त्याच्या कडेला फेकले गेले.

अपघाताची माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर सातही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही कार महामार्गावरुन बाजूला हटवण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;