हिंदुस्थानच्या यशाने रावळपिंडी एक्सप्रेस सुखावली
टी-20 वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात हिंदुस्थानने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. हिंदुस्थानच्या या विजयावर रावळपिंडी एक्सप्रेसने समाधान व्यक्त केले आहे. हिंदुस्थानी संघाचे हे यश पाहून मला खूप आनंद झाला असून, हिंदुस्थानी संघ खरोखरच या यशासाठी पात्र होती. रोहित शर्मा सारखा कर्णधार आणि भेदक गोलंदाज संघात असल्याने त्यांना हे यश मिळणारच होते, अशा शब्दांत शोएब अख्तरने हिंदुस्थानच्या संघावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. पावसाच्या व्यत्ययामुळे हिंदुस्थानचा इंग्लंडविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना रात्री उशीरा संपला. सामना संपल्यानंतर अख्तरने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला असून, हिंदुस्थानी संघाच्या कामगिरीचे तोंड भरून कौतुक केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List