मुंबईमधील युवासेनेच्या पदांकरिता विधानसभानिहाय मुलाखती 

मुंबईमधील युवासेनेच्या पदांकरिता विधानसभानिहाय मुलाखती 

शिवसेना पक्षात काम करण्याकरिता युवकांना संधी देण्यात येणार आहे. मुंबईमधील विधानसभानिहाय युवासेनेच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून सर्व पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना समान संधी असून मोठय़ा संख्येने युवासेनेचे भाग होता येणार आहे. विद्यमान पदाधिकारी पुन्हा मुलाखत देऊ शकतात. युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱयांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखती पूर्वी एक तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच येताना आपले छायाचित्र सोबत आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज मुलाखती ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे.

सर्व मुलाखती – रविवार, 30 जून 2024 

1) विधानसभा-अंधेरी पूर्व, शाखा क्रमांक 80, नागरदास रोड, वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत.

 2) विधानसभा – जोगेश्वरी पूर्व, शाखा क्रमांक 77, मेघवाडी, जोगेश्वरी पूर्व, वेळ – दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत.

3) विधानसभा – अंधेरी पश्चिम, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, गोमांतक हॉल, अंधेरी पश्चिम. वेळ – सकाळी 10 ते दुपारी 1 वाजता.

4) विधानसभा – धारावी, शाखा क्रमांक 184, शीव रेल्वे स्थानकाजवळ, धारावी, वेळ – दुपारी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत.

5) विधानसभा- मुलुंड, शाखा क्रमांक 105, 90 फिट रोड, मुलुंड पूर्व, वेळ – सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत.

6) विधानसभा – भांडुप पश्चिम, शाखा क्रमांक 115, सह्याद्रीनगर, भांडुप पश्चिम, वेळ – दुपारी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत.

7) विधानसभा – घाटकोपर पूर्व, शाखा क्रमांक 131, पंतनगर, घाटकोपर पूर्व, वेळ – सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत.

8) विधानसभा – वरळी, शाखा क्रमांक 195, बीडीडी चाळ, वरळी, वेळ – सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;