संजय राऊत यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी, तर अरविंद सावंत यांची लोकसभा नेतेपदी नियुक्ती; अनिल देसाई प्रतोद
शिवसेना पक्षाच्या संसदीय नेतेपदाची जबाबदारी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. लोकसभेतील गटनेतेपदी खासदार अरविंद सावंत यांची तर खासदार अनिल देसाई यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पत्र पाठवून अभिनंदन केले आहे. 18 व्या लोकसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 9 आणि राज्यसभेत 2 सदस्य आहेत. लोकसभेतील गटनेते म्हणून अरविंद सावंत आणि मुख्य प्रतोदपदी अनिल देसाई यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बिर्ला यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे राज्यसभेतील पक्षाचे गटनेते आहेत. त्याचबरोबर दोन्ही सभागृहांतील संसदीय पक्षाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्षांना कळविले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List