अर्थसंकल्प म्हणजे जनतेला खूष करण्यासाठी आश्‍वासनांची खैरात; माणिकराव ठाकरे यांचा सरकारवर निशाणा

अर्थसंकल्प म्हणजे जनतेला खूष करण्यासाठी आश्‍वासनांची खैरात; माणिकराव ठाकरे यांचा सरकारवर निशाणा

>>प्रसाद नायगावकर

विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आश्वासनांची खैरात व सवंग घोषणा केल्या आहेत. मात्र, घोषणेप्रमाणे प्रत्यक्ष कृती करण्यासाठी शासनाकडे आर्थिक तजवीज आहे का? असा सवाल करत गोव्याचे प्रभारी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पावर जळजळीत टीका केली आहे.

“लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजप, शिंदे गट व अजित पवार राष्ट्रवादी मित्रपक्ष महायुतीला पूर्णत: नाकारले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या दमणशाही वृत्तीचा मतदारांनी मतपेटीतून समाचार घेतला. राज्यात काँग्रेस, उद्धव ठाकरे व शरद पवार राष्ट्रवादी पक्षाला जनतेने कौल दिला आहे. त्यामुळेच भविष्य ओळखून राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना सत्ताधाऱ्यांनी जनतेला खूष करण्यासाठी व आगामी विधानसभा डोळ्यापुढे ठेवून आश्‍वासनांची खैरात व सवंग घोषणा केल्या आहे. मात्र, घोषणेप्रमाणे प्रत्यक्ष कृती करण्यासाठी शासनाकडे आर्थिक तजवीज आहे का? याबाबत कुठेही लक्ष दिले नाही. एकंदरीत राज्याचा हा अर्थसंकल्प म्हणजे पावसाळ्यात फसव्या घोषणांची अतिवृष्टी होय.” अशी जळजळीत टीका माणिकराव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;