Nagar News : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

Nagar News : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

दुधाला कायम स्वरुपी 40 रुपये भाव मिळावा तसेच शेतकर्‍यांचे कर्ज सरसकट माफ करण्यात यावे या मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या पार्श्वभुमीवर राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत राहुरी येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर 2 जूलै 2024 रोजी राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रस्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाबाबत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी माहिती दिली असून महसूल प्रशासनाला तसे निवेदन देण्यात आले आहे.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे व धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली आज दि. 28 जून 2024 रोजी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, दुधाला 40 रुपये हमीभाव मिळावा, शेतकर्‍यांचे कर्ज सरसकट माफ करावे, शेती कर्जा बाबत होणारी सक्तीची वसूली त्वरीत थांबवीण्याचे आदेश पारीत करावे, दुध पावडर निर्यातीला प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, तसेच 40 टक्के निर्यात शुल्क कमी करून पावडर निर्यातीला परवानगी देण्यात यावी. दुध भेसळ व काटा मारीच्या नियंत्रणासाठी शासनाच्या अधिपत्याखाली शेतकरी प्रतिनिधींची भरारी पथके नेमावी. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच या मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत 2 जूलै 2024 रोजी राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रस्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी रवींद्र मोरे यांनी दिली.

यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे, मधुकर घाडगे, सतिष पवार, जुगलकुमार गोसावी, आनंद वने, प्रमोद पवार, सचिन पवळे, सागर पेरणे, नितीन कदम, सचिन गडगुळे, किशोर वराळे, राहुल करपे, गुलाबराव निमसे, राहुल तमनर, शामराव ढोकणे, अमोल शिंदे, गणेश खुळे, रेवन्नाथ बाचकर, विजय उंडे, प्रशांत चव्हाण, कृष्णा तनपूरे, विलास वराळे, सुनील वराळे, निलेश चव्हाण आदि उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;