वीज जोडणी तोडू असे सांगून 94 हजार रुपयांची फसवणूक

वीज जोडणी तोडू असे सांगून 94 हजार रुपयांची फसवणूक

वीज जोडणी तोडण्याबाबतचा संदेश मोबाईलवर पाठवून एका महिलेची तब्बल 92 हजार 200 रुपयांची फसवणूक केल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. याबाबत अज्ञात इसमावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधुरी चितळे यांच्या मोबाईलवर वीज जोडणी तोडण्याबाबतचा एक संदेश आला. त्या संदेशामध्ये देण्यात आलेला मोबाईल क्रमांक 9356248602 या क्रमांकावर चितळे यांनी संपर्क केला. त्यावेळी फोन उचलणाऱ्या व्यक्तीने मिश्रा हे नाव सांगून आपण वीज विभागातील अधिकारी असल्याचे सांगितले. तुमची वीज जोडणी तोडली जाऊ शकते. तसेच दंड भरावा लागेल असे सांगितले. वीज जोडणी तोडू नये आणि दंड भरावा लागू नये याकरीता आपण तुम्हाला मदत करु असे सांगून मिश्रा नामक व्यक्तीने चितळे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर चितळे यांना गुगल पेच्या माध्यमातून 94 हजार 200 रुपये डेबीट करण्यासाठी भाग पाडले आणि त्यांची फसवणूक केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;