तुझ्यासारखंच पायलने दुसरं लग्न केलं तर चालेल का? अरमानने दिलं उत्तर

तुझ्यासारखंच पायलने दुसरं लग्न केलं तर चालेल का? अरमानने दिलं उत्तर

बिग बॉस ओटीटीचा तिसरा सिझन अवघ्या आठवडाभरापूर्वी सुरू झाला असून त्यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे. युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नींनी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. आता नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्री सना मकबूल अरमानला पॉलिगॅमीवरून (बहुपत्नीत्व) प्रश्न विचारते. अरमानने पायल आणि कृतिका या दोघींसोबत लग्न केलं असून तिघं एकाच घरात एकत्र राहतात. हेच जर पायलने केलं तर चाललं असतं का, असा प्रश्न सनाने अरमानला केला. पायल ही अरमानची पहिली पत्नी आहे. तर कृतिका ही पायलचीच खास मैत्रीण आहे. “भूमिकांना उलटं करून पाहुयात, पायलने जर एखाद्या पुरुषाला आणलं असतं, तर ते तुला चाललं असतं का”, असा सवाल सनाने विचारला.

सनाचा प्रश्न ऐकून अरमानचा संताप अनावर झाला. सनाला उत्तर देत तो म्हणाला, “ती त्याला आणून घरात ठेवणार का? ती नंतरची गोष्ट आहे, याचं काहीच उत्तर नाही.” तरीसुद्धा सना त्याला नेमकं उत्तर द्यायला सांगते. तेव्हा अरमानने कबुली दिली की जरी पायलने कृतिकासोबतचं त्याचं दुसरं लग्न स्वीकारलं असलं तरी तो पायलचं दुसरं लग्न स्वीकारू शकत नाही. अरमान याविषयी म्हणाला, “पायलने जरी स्वीकारलं असलं तरी मी ते स्वीकारू शकत नाही. जर पायल लग्न करून एखाद्या पुरुषाला आणत असेल तर, भावा तू तुझ्या खुश आणि मी माझ्या घरी खुश! ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kritika malik (@kritika_malik_9)

नेमकं एक दिवस आधीच पायल बिग बॉसच्या घरात अरमानच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना रडली होती. अरमानने 2011 मध्ये पायलशी लग्न केलं. या दोघांना चिरायू मलिक हा मुलगा आहे. त्याच्या सहा वर्षांनंतर 2018 मध्ये अरमानने पायलचीच खास मैत्रीण कृतिकाशी दुसरं लग्न केलं. त्यावेळी अरमानने कायदेशीररित्या पायलला घटस्फोट दिला नव्हता. 4 डिसेंबर 2022 रोजी अरमानने त्याच्या दोन्ही पत्नी गरोदर असल्याचं युट्यूब चॅनलवर जाहीर केलं होतं. अरमान आता चार मुलांचा पिता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;