लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईवरच संशय; आनंद व्यक्त करण्यावरून गुन्हे दाखल करण्याची मागणी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईवरच संशय; आनंद व्यक्त करण्यावरून गुन्हे दाखल करण्याची मागणी

लाचलुचपत विभागामार्फत आयुक्तांवर झालेल्या कारवाईनंतर जातीय मानसिकतेतून ज्यांनी आनंद व्यक्त केला, त्यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी, तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईची चौकशी करावी, अशी मागणी आंबेडकरी चळवळीच्या सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे केली आहे. तसेच या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. याबाबत शनिवारी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांच्याकडे कारवाईची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. त्या कारवाईनंतर अनेकांनी पालिकेसमोर फटाके वाजवले, ही बाब अत्यंत निंदनीय आहे. मागासवर्गीय बौद्ध अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर अशा प्रकारचा आनंद साजरा करणे हे कितपत योग्य आहे, त्यामुळे संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे, अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

याआधाही महानगरपालिकेमध्ये अनेक वेळेला अशा पद्धतीच्या कारवाई झाली आहे. ही काही पहिली कारवाई नाही, पण यंदाचा ट्रॅप हा मागासवर्गीय बौद्ध अधिकाऱ्यावर लावला असल्याने काही जातीवादी प्रवृत्तींनी आनंद व्यक्त केला. तसेच काहींनी मीडियामध्ये जाऊन आदळआपट केली. आयुक्त जावळे यांनी दहा वर्षापासून प्रलंबित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा प्रश्न तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे. कामाच्या बाबतीत ते कोणत्याही प्रकारची हयगय करत नाही. एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, ते कोणापुढेही ते झुकले नाही, त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर ज्यांनी फटाके वाजवले त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जी कारवाई केली ती संशयास्पद आहे पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले होते त्यातील इतरांना का सोडून दिले असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित करण्यात आला या प्रकरणासंदर्भामध्ये सर्व संशयास्पद भूमिका आहे .

जर या विभागाला 19 तारखेला हे सर्व गोष्टी माहीत होत्या तर त्यांनी 27 तारखेला गुन्हा का दाखल केला असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित झाला त्यामुळे एकंदरीतच या विभागाने केलेल्या कारवाईची चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी त्यांनी केली जर तसेच झाले नाही तर आम्ही इतरांची नावे घोषित करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. तसेच या कारवाईच्या मागे अन्य कुणी आहे का याची सुद्धा माहिती आम्ही घेतली असून लवकरच ती सुद्धा मांडू असा इशारा दिला आहे

नगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर आज महापालिकेतील एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. लाच प्रकरणांमध्ये आयुक्त पंकज जावळे यांच्या सह लीपीकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. आयुक्तांचे दालन सील करण्यात आलेले आहे. घटना घडल्या नंतर अनेकांनी मोठी धास्ती घेतलेली आहे, काल दिवसभर महानगरपालिकेमध्ये या कारवाईबाबतची चर्चा सुरू होती.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांचाही शोध घेण्यासाठी आता दोन पथके पाठवलेले आहेत अद्याप पर्यंत त्यांचा ठाव ठिकाणाला लागलेला नाही पण दुसरीकडे आज महानगरपालिकेतील एक अधिकारी व चार इतरांची चौकशी करण्यात आलेली आहे त्यांचे जबाब सुद्धा घेण्यात आलेले आहेत नेमके ते कोण होते याची माहिती मिळू शकली नाही.

महानगरपालिकेमध्ये गेल्या दोन दिवसापासून कारवाईबाबतची चर्चा चांगलीच होऊ लागली आहे अनेकांनी याची धास्ती घेतली असून नेमकी कोणी याबाबत तक्रार केली याची चर्चा सध्या सुरू आहे या प्रकरणांमध्ये पोलीस अजून कशा पद्धतीने कारवाई करतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;