शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देतो सांगून 17 लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देतो सांगून 17 लाखांची फसवणूक

फेसबुकवरुन शेअर मार्केटची माहिती घेत असताना एका व्हॉटसअप ग्रुपमध्ये सहभागी होऊन एकाची तब्बल 17 लाख 84 हजारांची फसवणूक झाली. शेअर मार्केटमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली.

दिनेश मोहनलाल जैन, (60), रा. थिबा पॅलेस हे फेसबुकवरून शेअर मार्केटची माहिती घेत होते. त्यावेळी एम 11 मॅक्झीमा फायनान्शियल सिक्युरिटीज या जाहिरातीवरुन फिर्यादी यांनी शेअर मार्केटसंदर्भातील एका व्हॉटसअप ग्रुपमध्ये सहभाग मिळवला. त्या ग्रुपचा अॅडमीन असलेल्या कुणाल गुप्ता आणि जेनीस मेहरा या नावाच्या व्यक्तींनी दिनेश जैन यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना लिंक पाठवून डी मॅट अकाऊंट ओपन करण्यास सांगितले. विविध आयपीओ आणि शेअर मार्केटमध्ये कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडले. दिनेश जैन यांची 17 लाख 84 हजार रुपयांची फसवणूक झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिनेश जैन यांनी रत्नागिरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;