चहा बनविण्यास नकार देणे बेतले जीवावर, सासूने केली सूनेची हत्या

चहा बनविण्यास नकार देणे बेतले जीवावर, सासूने केली सूनेची हत्या

हैद्राबादच्या अट्टापूरमध्ये गुरुवारी एक विचीत्र घटना घडली आहे. सासूला चहा देण्यास नकार देणे एका सूनेच्या जीवावर बेतले आहे. सासूने चक्क सूनेची गळा आवळून हत्या केली आहे. हत्येनंतर सासू फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

अजमीरा बेगम (28) असे मृत महिलेचे नाव आहे. गुरुवारी रात्री जवळपास सव्वा दहा वाजता अजमीरा हिला तिच्या सासू फरजाना बेगमने चहा बनवायला सांगितला. दरम्यान अजमीराने फरजाना यांना ती दुसऱ्या कामात व्यस्त असल्याने चहा देण्यासाठी नकार दिला. मात्र काही वेळ वाट पाहिल्यानंतर चहा न मिळाल्याने तिने अजमीरावर संताप व्यक्त केला. त्यावरुन दोघींमध्ये वाद झाला आणि तो विकोपास पोहोचला. संतापलेल्या फरजानाने अजमीराला धक्का दिल्याने ती खाली पडली आणि ओढणीच्या सहाय्याने तिचा गळा आवळला. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

या हत्येनंतर फरजाना फरार झाली आहे. याआधी स्थानिक लोकांच्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत फरजाना घरातून फरार झाली होती. घटनेवेळी अजमीराचा पती अब्बास आणि त्याची दोन मुले आणि सासरे नव्हते. पोलिसांनी सांगितले दोघांचे 2015 मध्ये लग्न झाले होते. अट्टापूर पोलिसांनी केलेल्या तपासात कळले की, सासू-सूनमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. तो चहावरुन वाढला आणि सूनेची सासूने हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फऱजानाचा तपास सुरु आहे. यासाठी पोलीस आरोपीच्या ओळखींच्या लोकांकडे तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;