Kalki 2898 Ad on OTT: ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येईल अमिताभ बच्चन-प्रभास यांचा ‘कल्की 2898 एडी’

Kalki 2898 Ad on OTT: ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येईल अमिताभ  बच्चन-प्रभास यांचा ‘कल्की 2898 एडी’

‘बाहुबली’ स्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. यामध्ये प्रभाससोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण, दिशा पटानी, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. शुक्रवारी थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होताच अनेकांनी ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहिला आणि सोशल मीडियावर चित्रपटाविषयी मत मांडलं. अनेकांनी या चित्रपटाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच ‘कल्की’च्या ओटीटी स्ट्रीमिंगविषयीही प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी प्रदर्शित होईल, याविषयीची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचा बजेट तब्बल 600 कोटी रुपये इतका आहे. या पॅन इंडिया चित्रपटात दमदार व्हीएफएक्स आणि सीजीआय इफेक्ट्स पहायला मिळतील. निर्मात्यांनी या चित्रपटाचे ओटीटी हक्क विकून तगडी कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स हे एक नाही तर दोन प्लॅटफॉर्म्सना विकण्यात आले आहेत. एकीकडे ‘नेटफ्लिक्स’ने हिंदी भाषेतील या चित्रपटाचे राइट्स विकत घेतले आहेत, तर दुसरीकडे ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने या चित्रपटाच्या दाक्षिणात्य भाषेतील राइट्स विकत घेतले आहेत.

नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे हक्क 175 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. तर ॲमेझॉन प्राइम व्हिडीओसोबत 200 कोटी रुपयांमध्ये हा करार निश्चित करण्यात आला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या दोन महिन्यांनंतर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत प्रेक्षकांना हा चित्रपट ओटीटीवर पाहता येईल.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात 27.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा आकडा फक्त हिंदी भाषेचा आहे. तर जगभरात या चित्रपटाची कमाई सर्व भाषांमध्ये मिळून 190 कोटी रुपयांची झाली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;