सलमान खान याच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा, साजिद नाडियावालाने अखेर ‘तो’…
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत असतो. सलमान खानची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हेच नाही तर सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. किसी का भाई किसी की जान हा सलमान खानचा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. विशेष म्हणजे सलमान खानचा हा चित्रपट धमाका करताना दिसला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही सलमान खान दिसला. सलमान खान कधी लग्न करणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय.
प्रोड्यूसर साजिद नाडियावाला आणि सलमान खान हे खूप चांगले मित्र आहेत. विशेष म्हणजे साजिद नाडियावाला आणि सलमान खान यांची मैत्री इतकी जास्त खास आहे की, दोघे एकाच दिवशी लग्न देखील करणार होते. अखेरच्या क्षणी सलमान खान याने आपला निर्णय बदलला आणि फक्त साजिद नाडियावाला यालाच लग्न करावे लागले.
साजिद नाडियावालाने याबाबतचा खुलासा केलाय. 2000 मध्ये साजिद नाडियावालाचे लग्न झाले. त्याचदिवशी सलमान खान हा देखील लग्न करणार होता. साजिद नाडियावाला म्हणाले की, मी आणि सलमानने एकाच दिवशी लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र, त्यानंतर सलमान खान हा गायब झाला आणि थेट माझ्या लग्नाच्या दिवशीच आला.
माझे लग्न होते, त्यादिवशी सलमान खान हा स्टेजवर आला आणि म्हणाला की मागे गाडी उभी आहे, अजूनही वेळ गेली नाहीये पळ…साजिद नाडियावालाने हा खुलासा कपिल शर्माच्या शोमध्ये केला. सलमान खान आणि साजिद नाडियाडवाला यांची मैत्री खूप जुनी आहे आणि त्यांचे बॉन्डिंग नेहमीच बघायला मिळते.
सलमान खान हा ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न करेल असे सांगितले जात होते. मात्र, अचानक यांचे ब्रेकअप झाले. फक्त ऐश्वर्या राय हिच नाही तर सलमान खान याने अनेक वर्षे कतरिना कैफ हिला देखील डेट केले. मात्र, अजूनही सलमान खानने लग्न केले नाहीये. सलमान खानचे नाव आतापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत देखील जोडले गेले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List