‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये मोठा ट्विस्ट; निशीच्या आयुष्यात निकिता नावाचं वादळ
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत रघुनाथ आणि उमाचा संघर्ष सुरूच आहे. रघुनाथवर चोरीचा आरोप होतो. श्याम पोलिसांना सांगतो की हे पैसे मीच त्यांना दिले होते. पण मी नंतर विसरून गेलो. रघुनाथ खोतांबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही ही फॅक्टरीच त्यांच्यामुळे उभी आहे.
श्यामचं ऐकून पोलीस दादा खोतांवर कारवाई न करता निघून जातात. शिर्केचा प्लान फसलाय. रघुनाथ एक स्वाभिमानी व्यक्ती आहे. एवढं सगळं झाल्यावर तिथे थांबणं त्यांना ठीक वाटत नाही आणि ते तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतात.
दुसरीकडे रघुनाथच्या लेकीच्या म्हणजेच निशीच्या आयुष्यात एक नवीन वादळ घोंघावतंय. निशी आणि नीरजला सगळं कुटुंब निरोप देतं. निशीची रीतसर पाठवणी होते. जाताना निशी ओवीला आणि श्रीनुला आपलं दुभंगलेलं घर पुन्हा जोडण्यासाठी प्रयत्न करा म्हणून विनंती करते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List