सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने जाळली बैलगाडी; अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त

सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने जाळली बैलगाडी; अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त

>> प्रसाद नायगावकर

राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी एका शेतकऱ्याने आपली बैलगाडी जाळत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी कुणाल जतकर यांनी त्यांची स्वतःची बैलगाडी नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मंगरूळ साखर कारखान्याजवळ जाळली. शेतकरी कर्जमाफीसाठी रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. मात्र, त्या पत्राची दखलही घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी कुणाल जतकर यांनी नागपूर – तुळजापूर महामार्गावर स्वतःची बैल गाडी जाळून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न अनोख्या आंदोलनातून केला. यावेळी पेरणी तर कशी बशी झाली. सावकाराकडून पैसे आणून केली. मात्र, आता पिकांना खत देण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे आता या बैलगाडीचे काय करायचे, असा सवाल करत संतप्त शेतकरी कुणाल जतकर यांनी बैलगाडी जाळत सरकारचा निषेध केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;